बांधकाम विकासकांना प्रीमियममध्ये 50% सवलत, घरांच्या किंमती कमी होण्याची आशा

 

बांधकाम विकासकांना प्रीमियममध्ये 50% सवलत, घरांच्या किंमती कमी होण्याची आशामुंबई : बांधकाम विकासकांना प्रीमियममध्ये 50% सवलत देण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रस्तावाला मंजुरी मिळाली. यामुळं बांधकाम व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. सरकारमधील तीनही पक्षांची चर्चा झाल्यानंतर आज या प्रस्तावाला मंजुरी मिळाली. या निर्णयामुळं बांधकाम व्यावसायिकांना दिलासा मिळणार असला तरी महापालिकेला मात्र फटका बसणार आहे.

या निर्णयाबाबत नगरविकास राज्य मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी सांगितलं की, महापालिका यांच्याकडून त्यांचे उत्पन्न कोरोना काळात कमी झाले होते. त्यामुळे त्यांच्याकडून प्रीमियममध्ये सूट मिळावी असे प्रस्ताव आले होते, त्यांच्या उत्पन्नात मोठी घट झाली होती. महापालिकेला उत्पन्न मिळावे म्हणून आज निर्णय घेण्यात आला, असं ते म्हणाले. तनपुरे म्हणाले की, जे फ्लॅट विकतील त्यात मुद्रांक शुल्क लाभ मिळेल. स्टॅम्प ड्युटी ही बिल्डरांनी भरावी. प्रीमियम भरण्यासाठी बिल्डरांना फायदा होईल. घरांच्या किमती कमी होतील. रिडेव्हलपच्या प्रकल्पात यातून फायदा होईल, असं तनपुरे म्हणाले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post