प्राथमिक शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत मंत्र्यांनी दिली 'ही' ग्वाही

 प्राथमिक शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न प्राधान्याने सोडविणे कामी लवकरच मंत्रालयात बैठकीचे आयोजन


अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाने दिले मंत्रालयात निवेदन अहमदनगर : प्राथमिकशिक्षकांचे प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी मंत्रालयात लवकरच संघटना प्रतिनिधींची बैठक घेणार असल्याचे आश्वासन ग्रामविकासमंत्री व शिक्षणमंत्री यांनी अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाच्या प्रतिनिधी मंडळास दिले असल्याची माहिती अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे राज्य सरचिटणीस कल्याण लवांडे व राज्य संघटक राजेंद्र निमसे यांनी दिली.

अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाच्या प्रतिनिधी मंडळाने नुकतीच मुंबई येथे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ तसेच शिक्षणमंत्री वर्षाताई गायकवाड  यांची शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत भेट घेवून मागण्याचे निवेदन दिले.


यामध्ये प्रामुख्याने जूनी पेन्शन योजना लागू करणे ,शिक्षणसेवकांचे मानधन वित्त विभागाची मान्यता घेवून तात्काळ वाढविण्यात येत असून केंद्रप्रमुख पदे भरण्याबाबत मागणी २० जानेवारी रोजी झालेल्या  व्हिसी मध्ये चर्चा झाली आहे.तसेच अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनाचा अधिकार मुख्यकार्यकारी अधिकारी यांना देणे तसेच शिक्षकांची बिंदुनामावली अद्ययावत करणे, संगणक अर्हता परीक्षेस मुदतवाढ ,वेतनासाठी सीएमपी प्रणाली लागू करणे, आंतरजिल्हा बदलीचे नवीन धोरण निश्चित करून पुढील टप्पा राबविणे, शिक्षकांना मुख्यालयी राहण्याची अट रद्द करणे, आंतरजिल्हा बदलीने आलेल्या शिक्षकांची संपूर्ण सेवा सेवाजेष्ठता साठी ग्राह्य धरणे, बीएलओ च्या कामातून शिक्षकांना वगळणे, ग्रामपंचायत निवडणूक कामाचे मानधन मिळणे आदी मागण्या करण्यात आलेल्या आहेत .शिक्षकांचे प्रश्न प्राधान्याने सोडवणार असून एकाच वेळी सर्व प्रश्न मांडण्याऐवजी प्रमुख सात / आठ मागण्या फेब्रुवारी २०२१मध्ये मंत्रालय, मुंबई येथे बैठक घेवून सोडवू असे शिक्षणमंत्री वर्षाताई गायकवाड यांनी प्रतिनिधी मंडळाला स्पष्ट आश्वासन दिले.

जिल्हांतर्गत व आंतरजिल्हा बदल्यांचे नवीन धोरणावर कोरोनाकाळात निर्णय घेण्यास उशीर झाला असला तरी येत्या महिनाभरात नवीन व सर्वसमावेशक शासन निर्णय निर्गमित होणार असल्याचे ग्रामविकास मंत्री मा. हसन मुश्रीफ यांनी शिष्टमंडळाशी झालेल्रा चर्चेत सांगितले.


संघाच्या या राज्य प्रतिनिधी मंडळात अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाचे  राज्य सरचिटणीस कल्याण लवांडे, राज्य संघटक राजेंद्र निमसे, अहमदनगर  जिल्हाध्यक्ष बाळासाहेब कदम, नगर तालुका कोषाध्यक्ष विनायक गोरे यांचा समावेश होता.


         

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post