जिल्ह्यातील सर्वात मोठं करोना लसीकरण 'या' ठिकाणी सुरू

 कोविड लसीकरण  मोहीम सकारात्मक पाऊल - डाॅ राजेंद्र विखे पाटील
लोणी दि२९ (प्रतिनिधी) - कोरोना महामारीचा शेवटाचा प्रवास आता सुरु झाला आहे. कोविड लसीकरण मोहीम हे यातील एक  पाऊल आहे. या मोहिमे अंतर्गत जिल्ह्यातील सर्वात मोठे लसीकरण आज प्रवरा आरोग्य अभिमत विद्यापीठात सुरु झाल्याची माहिती विद्यापीठाचे कुलपती डाॅ राजेंद्र विखे पाटील यांनी दिली.


प्रवरा मेडिकल ट्रस्ट , प्रवरा आरोग्य अभिमत विद्यापीठ व महाराष्ट्र शासनाचा आरोग्य विभाग यांच्या वतीने कोविड योध्दासाठी आयोजीत लसीकरण मोहीमेस आज डाॅ राजेंद्र विखे पाटील यांच्या उपस्थितीत प्रारंभ झाला यावेळी ते बोलत होते. या प्रसंगी मेडिकल काॅलेजचे अधिष्ठाता डाॅ. राजवीर भलवार, तालुका आरोग्य अधिकारी डाॅ प्रमोद म्हस्के , डाॅ रविंद्र कारले, डाॅ राहुल कुंकुलोळ आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी पुढे बोलतांना डाॅ राजेंद्र विखे पाटील यांनी १२०० पेक्षा जास्त नागरिकांना या कोविड रुग्णालयाची कोविड संसर्गाच्या आजारातुन मुक्त होण्यास मदत झाली. तर १०००० पेक्षा जास्त नागरिकांची कोविड चाचणीच्या सेवेचा लाभ या रुग्णालयतील लॅबच्या माध्यामतुन घेतली. प्रवरा मेडिकल ट्रस्ट ने केलेले हे काम कोविड साथीच्या इतिहासात कायम लक्षात ठेवले जाईल. पण आता वेळ आली आहे यासाथीच्या आजारातुन आपण अधिक सकारात्मक पणे बाहेर पडण्याची याचाच एक भाग असलेल्या कोविड लसीकरण मोहिमेस आपल्याकडे आज पासुन सुरुवात झाली आहे. जिल्ह्यातील सर्वाधिक मोठे लसीकरण आपल्या कॅम्पस मध्ये होत आहे. कोरोना लसीकरण या संसर्गजन्य साथीच्या मुक्तीची सुरुवात आहे असे मनोगत पुढे डाॅ विखे पाटील यांनी बोलतांना व्यक्त केले.
0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post