प्रचाराचा नादच खुळा...निवडणूक चिन्ह थेट घराच्या छतावर

 नाद खुळा.... निवडणूक चिन्ह थेट घराच्या छतावरनिवडणुकीत प्रचारासाठी उमेदवार कोणती आयडीया वापरतील हे कोणीच सांगू शकत नाही. विदर्भात खामगाव तालुक्यातील सुटाळा बु. ग्रामपंचायत निवडणूक लढवणाऱ्या एका उमेदवाराला निवडणूक चिन्ह ऑटोरिक्षा आले. त्यामुळे उमेदवाराच्या मुलाने खराखुरा ऑटोरिक्षा चक्क घराच्या छतावर नेऊन ठेवला. शेजारी प्रचाराचा बॅनरही लावला. उमेदवाराची ही आयडिया त्याला प्रत्यक्ष यश मिळवून देईल की नाही हे आता निकालावेळीच दिसून येईल.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post