31 जानेवारीला जिल्ह्यात सुमारे साडेचार लाख बालकांचे लसीकरण

 31 जानेवारीला जिल्ह्यात पल्स पोलीओ लसीकरण मोहिम

लाख 40 हजाराहून अधिक बालकांना देणार पोलिओ लसअहमदनगरजिल्ह्यात रविवार दिनांक 31 जानेवारी,2021 रोजी राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिम राबविली जाणार आहे. पल्‍स पोलिओ लसीकरणाकरीता अहमदनगर जिल्‍हयामध्‍ये 0 ते 5 वर्षे वयोगटातील ग्रामिण भागात 3 लाख 77 हजार 358 शहरी भागात 16 हजार 669 व महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्‍ये 46 हजार 260 असे जिल्‍हयामध्‍ये एकूण 4 लाख 40 हजार 287 बालकांना पोलिओ लसीचे डोस पाजण्‍यात येणार आहेत. दिनांक 31 जानेवारी 2021 रोजी ग्रामीण भागात 3 हजार 521 बुथ, शहरी भागात 87 व महानगरपालिका क्षेत्रात 374 असे एकूण जिल्हयामध्ये 3 हजार 982 बुथवर एकूण 9 हजार 110 कर्मचा-यांमार्फत पोलिओ लसीचे डोस पाजण्‍यात येणार आहेत. राज्यस्तरावरुन अहमदनगर जिल्‍हयाकरीता 6 लाख 10 हजार पोलिओ लसीचे डोस प्राप्त झाले आहेत, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे यांनी दिली आहे.

नागरिकांनी या मोहिमेमध्‍ये आपल्‍या 0 ते 5 वर्षे वयाच्‍या बालकांना यापुर्वी पोलिओ डोस दिला असला तरी या मोहिमेमध्ये पुन्हा पोलिओ डोस घेऊन राष्‍ट्रीय पल्‍स पोलिओ लसीकरण मोहिम 100 टक्‍के यशस्‍वी करावी असे आवाहन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा राजश्री घुलेउपाध्‍यक्ष तथा सभापती, आरोग्‍य व शिक्षण समिती प्रताप शेळकेजिल्‍हाधिकारी डॉ. राजेन्द्र भोसलेजिल्हा परिषदेचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश शिंदे यांनी केले आहे.

लसीकरण मोहिम दिनांक 31 जानेवारी 2021 रोजी रा‍बविण्‍यात येणार आहे. दिनांक 01 फ़ेब्रुवारी 2021 रोजी तांत्रीक खंड घेऊन ग्रामिण भागात 02 फ़ेब्रुवारी 202पासून 3 दिवस व शहरी भागात सलग 5 दिवस घरोघरी जावून राहिलेल्‍या लाभार्थ्‍यांना शोधून पोलिओ लस पाजण्‍यात येणार आहे. पोलिओ लसीपासून एकही लाभार्थी वंचित राहू नये यासाठी जिल्‍हयात 103 ट्रांझिट टीमव्‍दारे बस स्‍टँड, रेल्‍वे स्‍टेशन, धार्मिक स्‍थळे इत्‍यादी ठिकाणी व 131 मोबाईल टिमव्‍दारे ऊसतोड कामगार, भटके लोक, रस्‍त्‍यावरील मजूरी करणा-या लोकांची मुले यांना पोलिओ लसीचे डोस पाजण्‍यात येणार आहेत.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post