जि.प.तील आरोग्य अधिकार्‍यांची पदव्युत्तर पदवीसाठी निवड

 जि..तील आरोग्य अधिकार्यांची पदव्युत्तर पदवीसाठी निवड

पुढील शिक्षणाचा आरोग्य सेवेत निश्चित फायदा होईल

डॉ.संदिप सांगळे     नगर - जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील डॉक्टर्स आपआपल्या भागात नागरिकांना चांगली सेवा देत आहेतही सेवा देत असतांना ते आपले पुढील शिक्षण घेत असल्याने याचा फायदा आपल्या आरोग्य सेवेत निश्चित होईलअसे सांगून पुढील शिक्षणासाठी कार्यमुक्त केलेल्या डॉक्टरांना जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.संदिप सांगळे यांनी शुभेच्छा दिल्या.

          पदव्युत्तर पदवी/पदविका अभ्यासक्रमाकरीता नीट पीजी-2020 साठी अहमदनगर जिल्हा परिषद आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकार्यांची  पदव्युत्तर पदवीसाठी निवड झाली आहेयामध्ये नगर तालुक्यातील जेऊर प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ.धनंजय खंडागळे एम.डी.(भुलतज्ञही पदवी  खातगांव टाकळी प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ.निलेश कोल्हे यांनी डी..(भुलतज्ञही पदविका तर पाथर्डी तालुक्यातील तिसगांव प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ.भास्कर लाखुळे यांनी न्यूक्लेअर मेडिसिन या पदवीसाठी प्रवेशिका मिळविली आहे.

          या यशस्वी डॉक्टरांचा जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.संदिप सांगळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आलायाप्रसंगी राहाता तालुका आरोग्य अधिकारी डॉ.प्रमोद म्हस्केवरिष्ठ सहाय्यक महेश येनगंदुलकैलास डावरेसंख्याकि अधिकारी गलधरआरोग्य सेवक निलेश राजापुरे  आदि उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post