राज्यपालांना कंगनाला भेटायला वेळ आहे पण अन्नदात्याला भेटण्याऐवजी ते गोव्याला गेले

 राज्यपालांना कंगनाला भेटायला वेळ आहे पण अन्नदात्याला भेटण्याऐवजी ते गोव्याला गेलेमुंबई : ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मुंबईत आयोजित  केंद्रातील मोदी सरकारवर घणाघाती टीका केली.  पवारांनी शेतकऱ्यांचा मोर्चा मुंबईत आला असताना गोव्याला निघून जाणाऱ्या राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनाही खडे बोल सुनावले.“महाराष्ट्राच्या इतिहासात असा राज्यपाल आम्ही पाहिला नाही. त्यांना अभिनेत्री कंगना रनौतला भेटायला वेळ आहे, पण माझ्या कष्टकरी अन्नदाता शेतकऱ्याला भेटायला वेळ नाही,” असं म्हणत टीका केली.

 राज्याच्या राज्यपालाची ही नैतिक जबाबदारी होती की त्या राज्यातील कष्टकरी अन्नदाता या ठिकाणी फक्त निवेदन देण्यासाठी तुमच्याकडे येतोय. खरं म्हणजे त्यांनी याला सामोरं जायला हवं होतं. पण त्यांच्यात तेवढी सभ्यता नाही. त्यांनी कमीत कमी राजभवनात तरी बसायला हवं होतं. पण तेही धैर्य त्यांनी दाखवलं नाही. मी त्यावर अधिक बोलू इच्छित नाही,” असंही शरद पवार यांनी राज्यपालांना खडसावलं.केली.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post