कुणाच्या किती बायका आणि कुणी किती मुलं लपवली आहेत, हे बाहेर काढायचं का?

 

कुणाचे लग्न झाले होते, कुणाला किती मुलं होती, या गोष्टी बाहेर काढु का?

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा इशारापुणे: सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप झालेली तक्रार त्या महिलेनेचे मागे घेतली आहे. भाजपवाले दबावामुळे तक्रार मागे घेतली अशी टीका करत आहेत. 'आता जर इतरांच्या भानगडी बाहेर काढल्या तर विषय खूप लांब जाईल, कशाला खोलात जाण्यास सांगताय', अशा शब्दांत अजित पवार यांनी भाजपाच्या नेत्यांना इशारा दिला आहे. 

पुणे जिल्हा नियोजनच्या आढावा बैठकीला पवार आले होते. तेव्हा त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना हा इशारा दिला. धनंजय मुंडे यांनी करुणा शर्माबाबत जे सांगायचं होतं ते त्यांनी जाहीरपणे सांगितले आहे. विरोधकांनी उगीच फाटे फोडू नये. कुणी काय काय लपवाछपवी केली, कुणाचे लग्न झाले होते, कुणाला किती मुलं होती.  लग्न झालं होतं की नाही झालं, कुणाच्या किती बायका आणि कुणी किती मुलं लपवली आहेत हे काय आम्हाला ठाऊक नाही का?, असा इशारा दिला. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post