अनैतिक संबंधातून अभिनेत्रीचा खून, आरोपी अटकेत

 अनैतिक संबंधातून ज्येष्ठ अभिनेत्री जया पाटील यांचा  खून, आरोपी अटकेत



सातारा - ज्येष्ठ अभिनेत्री जया पाटील (वय ५६, रा. गजानन हौसींग सोसायटी, कृष्णानगर, सातारा) यांचा खून अनैतिक संबंधातून झाला असून, हा खून कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड (मावेली) येथील आनंत दाजीबा पेडणेकर (वय ३३) या युवकाने केला असल्याचे तपासात उघड झाले. पोलिसांनी पेडणेकर याला अटक केली असून, त्याला न्यायालयाने आठ दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे.

विविध मालिका आणि वेबसिरीजमध्ये काम करणाºया ज्येष्ठ अभिनेत्री जया पाटील यांची शनिवार, दि. १६ रोजी मध्यरात्री राहत्या बंगल्यामध्ये अज्ञाताने गळा चिरून हत्या केली होती. या घटनेमुळे सिनेक्षेत्रात प्रचंड खळबळ उडाली होती. चार दिवसांपासून पोलिसांनी तपासाला सुरूवात केली. अभिनेत्री जया पाटील यांच्या मोबाईलवर वारंवार फोन करणाºया व्यक्तींचीही पोलिसांनी कसून चौकशी केली. .त्यानुसार पोलिसांनी आनंत पेडणेकर याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. सुरूवातीला त्याने जुजबी माहिती देऊन पोलिसांना गुंगारा देण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याला पोलीसीखाक्या दाखविताच त्याने क्षणाचाही विलंब न करता खुनाची कबुली दिली. अभिनेत्री जया पाटील या अनैतिक संबंध ठेवण्यास जबरदस्ती करत होत्या. त्यामुळेच त्यांचा खून केल्याचे पेडणेकरने पोलिसांना सांगितले. पेडणेकरची आणि अभिनेत्री जया पाटील यांची काही महिन्यांपूर्वीच साताऱ्यात ओळख झाली होती. या ओळखीतूनच जया पाटील या त्याला फोन करून घरी बोलवत होत्या. घटनेदिवशीही पेडणेकर घरी आला. नेहमीसारखीच जया पाटील यांनी जबरदस्ती केल्याने पेडणेकरने त्यांचा चाकूने गळा चिरल्याचे तपासात समोर आले. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post