चंद्रकांत पाटील यांनी केली धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी

 

चंद्रकांत पाटील यांनी केली धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी



मुंबई: नातेवाईक महिलेकडून बलात्काराचा आरोप  झाल्याने सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी मंत्रीपदाचा तात्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. चंद्रकांत पाटील यांनी ट्विट करून ही मागणी केली आहे. मुंडे यांनी आपल्या चुकीच्या कृत्यामुळे तात्काळ राजीनामा दिला पाहिजे. मुंडेंवरील लैंगिक शोषणाचे आरोप पाहता त्यांना मंत्रीपदावर राहण्याचा कोणताही अधिकार नाही. भाजप महिला शाखेने एक पत्रक काढून मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. त्यामुळे आम्हीही या विषयावर आणखी जोरदार मागणी करत आहोत, असं पाटील यांनी म्हटलं आहे.



0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post