मोठी बातमी...मागासवर्गीयांच्या पदोन्नतीचा मार्ग मोकळा

 मोठी बातमी...मागासवर्गीयांच्या  पदोन्नतीचा मार्ग मोकळामुंबई : मागील तीन वर्षांपासून रखडलेल्या मागासवर्गीयांच्या ज्येष्ठतेनुसार पदोन्नतीचा मार्ग मोकळा करणारा निर्णय या विषयावर नेमलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीने घेतला होता. उर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीचे इतिवृत्त आज मंजूर झाले असून आता हा विषय अंतिम मंजूरीसाठी राज्य मंत्रिमंडळासमोर जाऊन त्यावर शिक्कामोर्तब होण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. पदोन्नतीच्या प्रतीक्षेत असलेल्या 45 हजार कर्मचाऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे. ऊर्जामंत्री डॉ नितीन राऊत यांनी मागासवर्गीयांच्या ज्येष्ठतेनुसार पदोन्नतीचा विषय वेळोवेळी उचलून धरला होता. अखेर आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या मुद्द्याला मान्यता दिल्याने डॉ नितीन राऊत यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post