कोरोनावर मात करुन आ.बबनराव पाचपुते लोकसेवेसाठी पुन्हा सज्ज !

 कोरोनावर मात करुन आ.बबनराव पाचपुते लोकसेवेसाठी पुन्हा सज्ज !नगर : भाजपचे वरिष्ठ नेते माजी मंत्री आ.बबनराव पाचपुते यांनी करोनावर यशस्वी मात केली आहे. प्रदीर्घ काळ उपचार घेतल्यानंतर ते काष्टी येथील निवासस्थानी परतले आहेत. यानंतर त्यांनी सोशल मिडियावर पोस्ट लिहून लोकांच्या सेवेसाठी सज्ज असल्याचे जाहीर केले आहे.

थोरा-मोठ्यांचे आशीर्वाद आणि तुम्हा सर्वांचं प्रेम, जिव्हाळा, आपुलकी आणि सदिच्छांच्या बळावर आज कोरोनावर यशस्वीपणे मात करुन घरी परत. खरं तर संकटकाळात आपण विविध माध्यमातून केलेली माझी विचारपूस आणि सोशल मीडियाद्वारे व्यक्त केलेल्या सदिच्छा मला कोरोनाशी लढताना बळ देऊन गेल्या.


काही काळ क्वारंटाईनमध्ये आणि काही काळ अतिदक्षता विभागात माझ्यावर उपचार करण्यात आले. डॉक्टरांचे मनापासूनचे प्रयत्न मला या संकटातून वाचवण्यात यश देऊन गेले.


माझ्यासह पत्नी डॉ. प्रतिभा ह्याही कोरोनावर उपचार घेत होत्या. अख्या घरात आम्ही दोघेच पॉझिटिव्ह आढळून आल्याने आम्हा दोघांनाच क्वारंटाईन व्हावे लागले. गेली चार दशके सातत्याने माणसात राहण्याची माझी सवय मात्र मला या कालावधीत अस्वस्थ करुन गेली. तरीही गेल्या तीन आठवड्यांचा काळ खूप वर्षांनी मला सलगपणे डॉ. प्रतिभा यांच्यासोबत घालवता आला, याचंही समाधान मनाशी आहेच.


कोरोनाच्या संकटावर मात केल्यानंतर नव्या दमाने पुन्हा एकदा आपल्या सेवेसाठी सज्ज होत आहे. कोरोना काळात माझ्यावर उपचार करणारे सर्व डॉक्टर्स, वैद्यकीय सेवक आणि सदिच्छा व्यक्त करणाऱ्या आपणा सर्वांचे आभार मानण्याऐवजी ऋणात राहून धन्यवाद व्यक्त करतो.


आपला,

आ. बबनराव पाचपुते

श्रीगोंदा-नगर विधानसभा मतदार संघ

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post