सोनं खरेदी करताना 'हा' पुरावा दाखवणं बंधनकारक, केंद्राच्या निर्णयाची सराफ व्यावसायिकांकडून अंमलबजावणी

 सोनं खरेदी करताना ओळखपत्र दाखवणं अनिवार्यनवी दिल्ली: करोना काळात सोन्याची खरेदी मोठ्या प्रमाणात होत असून येत्या दिवाळीपर्यंत सोन्याचे दर प्रतितोळा 63 हजारांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज तज्ज्ञांनी वर्तवला आहे.या पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी केंद्रीय अर्थमंत्रालयाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला होता. या निर्णयाची आता देशभरातील सराफा व्यापाऱ्यांकडून अंमलबजावणी केली जाणार आहे. त्यामुळे आता सोने, चांदी, हिरे, प्लॅटिनम आणि मौल्यवान रत्नांची खरेदी रोख पैसे देऊन करायची असल्यास तुम्हाला आधारकार्ड आणि पॅनकार्ड दाखवणे बंधनकारक राहील. अन्यथा देशातील कोणत्याही ज्वेलर्समध्ये तुम्हाला सोने खरेदी करता येणार नाही.

केंद्र सरकारच्या निर्णयानंतर आता सोने व्यापारी अगदी 2 लाखांपर्यंतच्या रोखीच्या व्यवहारांसाठीही KYC ची मागणी करु लागले आहेत. तसेच दोन लाखांपेक्षा कमी रकमेच्या व्यवहारासाठी ग्राहकांकडून पॅनकार्ड मागितले जात आहे. जेणेकरून आपल्याला भविष्यात ईडीच्या कारवाईला सामोरे जावे लागणार नाही, याची काळजी सराफा व्यापारी घेत आहेत

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post