महाराष्ट्र हादरला..भंडारा येथे सरकारी रुग्णालयात शिशु केअर युनिटला आग, १० बाळांचा मृत्यू

 

नवजात शिशू केअर युनिटला आग, १० बाळांचा मृत्यूभंडारा: जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या अतिदक्षता नवजात शिशु केअर युनिटला लागलेल्या आगीत 10 बाळांना मृत्यू झाला आहे. मध्यरात्री 2च्या सुमारास शॉर्ट सर्किट मुळे आग लागल्याचं सांगितलं जात आहे. धुरामुळे गुदमरुन या बाळांना मृत्यू झाल्याचं बोललं जात आहे.या यूनिटमधील 7 बाळांना वाचवण्यात यश आलं आहे. मात्र दुर्देवाने 10 बालकांचा धुरामुळे गुदमरून मृत्यू झाला आहे. शॉर्ट सर्किटमुळे अतिदक्षता नवजात शिशु केअर युनिटमध्ये आग लागल्याची माहिती मिळत आहे.ही अत्यंत दुर्दैवी घटना असून आगीत गुदमरून मृत्यू झालेल्या बालकांचं पोस्ट मार्टेम करणार नसल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. तसंच घटनेमागचं कारण शोधून घटनेतील दोषींवर कारवाई करणार असल्याचं आरोग्य राज्यमंत्री येड्रावर यांनी सांगितलं आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post