त्या महिलेकडून मलाही जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न, भाजप नेत्याची पोलिसात तक्रार, धनंजय मुंडे प्रकरणात नवा ट्विस्ट
मुंबई : रेणू शर्मा नावाच्या एका महिलेने बलात्काराचा गंभीर आरोप केल्याने राज्य सरकारमधील मंत्री धनंजय मुंडे यांचे राजकीय करियर पणाला लागलेले असताना या प्रकरणाला वेगळेच वळण मिळाले आहे. भाजपा नेते व माजी आमदार कृष्णा हेगडे यांनी संबंधित रेणु शर्मा या महिलेविरोधात अबोला पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला आहे.
"२०१० सालापासून रेणू शर्मा मला त्रास देत होती. वेगवेगळया फोन नंबरवरुन ती माझ्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होती. मी तिला प्रत्येकवेळी टाळत होतो. रेणू शर्मा माझ्या मागे लागली होती. तिला माझ्यासोबत संबंध प्रस्थापित करायते होते. ती मला हनी ट्रॅपच्या जाळयात अडकवण्याचा प्रयत्न करत होती" असा आरोप कृष्णा हेगडे यांनी केला आहे.
"तिने चार ते पाच वर्ष माझा पाठलाग केला. तिला तिच्या म्युझिक व्हिडिओसाठी पैसे हवे होते. म्हणून ती मागे लागली होती. सहा जानेवारीला २०२१ ला तिचा अखेरचा मेसेज आला. काही दिवसातच धनंजय मुंडे यांचे प्रकरण समोर आले. धनंजय मुंडे यांनी त्यांना ती महिला ब्लॅकमेल करत असल्याचे सांगितले. रेणू शर्मा सारखे जे लोक ब्लॅकमेल करतात, त्यांचा भांडाफोड झाला पाहिजे, सत्य समोर आले पाहिजे म्हणून मी आज तक्रार नोंदवण्यासाठी पुढे आलो" असे कृष्णा हेगडे यांनी सांगितले.
Post a Comment