नगरचे नामकरण 'अंबिकानगर' असे करावे, शिवसेनेची राज्य सरकारकडे मागणी

 नगरचे नामकरण अंबिकानगर असे करावे, शिवसेनेची राज्य सरकारकडे मागणी नगर :    उपरोक्त विषयास अनुसरून अहमदनगर जिल्हा व शहराचे नाव अंबिकानगर व्हावे अशी हिंदुह्यदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची इच्छा होती. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी नगर येथील ऐतिहासिक सभेत तमाम जनतेसमोर अहमदनगर शहराचा उल्लेख अंबिकानगर असा केला होता.  शहराचे “अंबिकादेवी" दैवत असून सदरचा इतिहास हा मुघल काळाच्या आगोदरचा आहे. तमाम नगरकरांची अ.नगर चे नाव अंबिकानगर करून जुना इतिहास लोकापर्यंत जावा अशी इच्छा आहे. त्यादृष्टीने राज्य सरकारने निर्णय घेतला जावा अशी मागणी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे यांनी केली आहे. याबाबत प्रा.गाडे यांच्या वतीने नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देण्यात आले आहे.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post