मनसे पाठवणार बाळासाहेब थोरातांना १० हजार पत्र, संभाजी महाराजांचा देदीप्यमान इतिहास सांगणार

 मनसे थोरातांना पाठवणार १० हजार पोस्ट कार्ड



नगर -  महाराष्ट्र नवनिर्मान सेनेने औरंगाबाद चे नामांतर संभाजी नगर करा. अशी मागणी केली असुन त्या मागणीला मनसे नगर जिल्ह्याचा पाठिंबा आहे. हि मागणी जोर धरत असतांना  कॉंग्रेस चे प्रदेशअध्यक्ष्य तसेच राज्याचे महसुल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी छत्रपती संभाजी महाराज नगर करायला कॉंग्रेस चा विरोध आहे अशी भुमिका घेतली असल्यामुळे जो महाराजांच्या नावाला विरोध करेल त्यांना महाराष्ट्र नवनिर्मान सेना सोडणार नाही.  हिन्दु धर्माचे दैवत छत्रपती संभाजी महाराज हे बाळासाहेब थोरातांच्या स्मरणात रहावे यासाठी व औरंगाबाद जिल्ह्यचे नाव बदलून संभाजी महाराज नगर करावे ह्या मागणीला केलेला विरोध बाळासाहेब थोरात यांनी मागे घ्यावा,  त्यासाठी मनसेच्या वतीने संभाजीनगर चे आमचे जिल्हा अध्यक्ष्य सुहास दशरते यानी जो 26 जानेवारी पर्यंत नामांतराचा अल्तिमेटम दिला. तो पर्यंत आज 5 जानेवारी पासुन मनसेच्या व जनतेच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज कि जय असा जयघोष पोस्टकार्ड वर लिहुन जिल्ह्यातून जवळपास दहा हजार पत्र बाळासाहेब थोरात यांच्या संगमनेर च्या घरच्या पत्यावर पाठवणार असल्याची माहीती मनसेचे जिल्हा सचिव नितीन भुतारे यांनी दिली आहे . 

या पत्र पाठवण्याचा शुभारंभ आज करण्यात आला यावेळी मनसे जिल्हाध्यक्ष सचिन डफळ , ,नितीन भुतारे  गजेन्द्र राशिनकर,अशोक दातरंगे, अॅड अनिता दिघे , परेश पुरोहित,गणेश मराठे,संकेत व्यवहारे, अंबादास गोटीपामुल उपस्थीत होते

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post