पिंपळगांव माळवीतील शिवयोद्धा फौंडेशनचे पदाधिकारी मनसे विद्यार्थी सेनेत दाखल
ग्रामीण भागाच्या विकासासाठी मनसे पाठबळ देणार - सुमित वर्मा
नगर - पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र नवनिर्माण सेना आता ग्रामीण भागातही लक्ष घालून तेथील युवकांना एकत्र करुन गावपातळीवरील प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घेत आहे. कोरोनानंतर सध्या ग्रामीण भागातील परिस्थिती बिकट झाली आहे. अशातच विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. ऑनलाईन शिक्षणाविषयी ग्रामीण भागात अजून म्हणावी तशी जागृती नाहीय. शाळा-कॉलेजचे प्रवेश, शिष्यवृत्ती, शासकीय योजनांची माहिती युवकांना होत नसल्याने यापासून ते वंचित राहत आहेत. या प्रश्नांना प्राधान्य देऊन ते सोडविणे गरजेचे आहे. मनसेने नेहमीच आपल्या ठोस भुमिकेमुळे अनेक प्रश्न मार्गी लावले आहेत. त्यामुळेच गावातील युवक आता मनसेमध्ये दाखल होत आहेत. या युवकांना योग्य दिशा देऊन ग्रामीण भागाच्या विकासासाठी मनसे पाठबळ देऊन गावपातळीवरील प्रश्न सोडण्याचा प्रयत्न करेल, असे प्रतिपादन मनसे विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष सुमित वर्मा यांनी केले.
पिंपळगांव माळवी येथील शिवयोद्धा फौंडेशनच्या पदाधिकार्यांनी मनसे विद्यार्थी सेनेत जिल्हाध्यक्ष सुमित वर्मा यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. याप्रसंगी तालुकाध्यक्ष संकेत जरे, फौंडेशनचे अध्यक्ष आदेश गायकवाड, भाऊसाहेब गव्हाणे, वैभव झिने, विशाल पाचारणे, शिवाजी गायकवाड, परमेश्वर गरड, बजरंग रणसिंग, हरिष गायकवाड आदि उपस्थित होते.
Post a Comment