नगर दौर्यावेळी शरद पवारांच्या मार्गावर मनसे लावणार 'हे' बॅनर

 


 *शरद पवारांचा दौरा आणि मनसे करनार  बॅनरबाजी.....नितीन भुतारे

"पवार साहेब खाजगी हॉस्पिटलने लुटमार केलेल्या  वाढीव बिलांची रक्कम  रुग्णांना परत मिळवुन द्या", असे बॅनर शरद पवारांच्या दौरा मार्गावर लावणार.नगर :  महाराष्ट्र नवनिर्मा चढ सेनेच्या वतीने कोरोना काळातील  खाजगी हॉस्पिटल मधील उपचार घेतलेल्या रुग्णांची वाढीव बिलांची रक्कम परत मिळावी त्याकरिता निवेदन देण्यात आली. आंदोलन करण्यात आली. उपजिल्हाधीकरी यांच्या समितीने संपुर्ण बिलांचे ऑडीट करुन  आता पर्यंत 14 ते 15 खाजगी हाॅस्पिटल कडुन जवळपास   एक करोड रुपये वसुलीचे आदेश महानगरपालिकला देण्यात आले. हे पैसे संबधित रुग्णांच्या बँक खात्यावर जमा करावे असे आदेश महानगरपालिका आयुक्तांनी, आरोग्य अधिकारी यांनी या सर्व हॉस्पिटल ला दिले. परंतु या सर्व हॉस्पिटलनी या  आदेशला केराची टोपली दाखवली. आजपर्यंत महानगरपालिकेने सुध्दा वाढीव बिलांची रक्कम परत न दिल्यामुळे  कुठल्याही प्रकारची कारवाई या संबधित  हॉस्पिटल वर केली नाही.  मनसेच्या वतीने वारंवार मुख्यमंत्री,आरोग्यमंत्री,पालकमंत्री यांना निवेदन पाठविले. परंतु कुणीही या जनतेच्या प्रश्नाकडे लक्ष दिले नसल्यामुळे रविवारी देशाचे सर्वोच्च नेते व महाविकास आघाडीचे प्रमुख येत आहेत. से ते येणार त्या मार्गावर ''पवार साहेब गोरगरीब जनतेची कोरोना आजारवरिल वाढीव बिलांची रक्कम परत मिळवुन द्या''असे बॅनर लावणार आहे. पवार साहेबांमुळे गोरगरीब जनतेची वाढीव बिलांची रक्कम परत मिळेल अशी अशा आम्ही व्यक्त करतो. त्यामुळे जिल्हाध्यक्ष सचिन डफळ व शहरध्यक्ष गजेद्र राशिनकर यांच्या सूचनेनुसार हे बॅनर लावण्यात येणार असुन  पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष मनोज राऊत, महिला उपजिल्हाध्यक्ष अॅड अनिता दिघे,  विनोद काकडे यांच्यासह  मनसेचे शिष्टमंडळ पवार साहेबांना भेटुन या संदर्भात निवेदन सुध्दा देणार आहेत.अशी माहीती मनसेचे जिल्हासचिव नितीन भुतारे यांनी दिली आहे. 
0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post