मनसेची नगर तालुक्याच्या राजकारणात दमदार एंट्री, 'या' गावात ठरणार किंगमेकर

 संदीप काळे यांच्या रुपाने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा तालुक्यातील राजकारणात शिरकाव - सुमित वर्मानगर -चिचोंडी पाटील ग्रामपंचायत निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संदीप काळे यांनी निवडणुकीत यशस्वीरीत्या बाजी मारली असून आता सत्ता स्थापनेसाठी दोन्ही पॅनेलला मनसे शिवाय पर्याय उपलब्ध राहीला नसुन आता एका सदस्याला महत्व प्राप्त झाले आहे.पक्षाध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांनी केलेल्या आदेशानुसार मनसेने ग्रामपंचायत निवडणुकीत सहभागी होऊन योग्य आणि होतकरू उमेदवार उभे करून त्यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न केले. त्यात अहमदनगर तालुक्यात एकमेव उमेदवार निवडून आला.मात्र पैश्यांच्या अमिशाच्या राजकारणा पलिकडे सुध्दा सर्वसामान्य तरूणांना देखील राजकारणात जागा आहे हे या निवडणुकीत पहायला मिळाले. संदीप काळे हा अतिशय सर्वसामान्यांमधील व्यक्तीमत्व म्हणून आज गावपातळीवर लोकांनी निवडून दिले , आता राजसाहेबांना अभिप्रत विकासकामे करून मतरूपी मिळालेला आशिर्वाद खरा करून दाखवण्यासाठी पुढाकार घ्यावा असे प्रतिपादन मनविसे जिल्हाध्यक्ष सुमित वर्मा यांनी संदीप काळे यांच्या सत्कारा वेळी केले. या वेळी भरत कोकाटे , योगेश गुंड , अक्षय परकाळे , जयेश महाडिक, तुषार तनपुरे , अतुल गवांडे , रोहित काळे, जयसिंग दळव , रामा काळे, भाऊ सरोदे , धिरज पंधारे ,मंगेश गवांडे, संतोष कैदके आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post