दिल्ली स्फोटाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात सुरक्षा व्यवस्था कडेकोट

 दिल्ली स्फोटाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात सुरक्षा व्यवस्था कडेकोट

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश



मुंबई : नवी दिल्लीतील इस्त्रायली दूतावासाजवळ स्फोट झाला आहे. या स्फोटामुळे अनेक गाड्यांच्या काचा फुटल्या आहे. दिल्ली पोलिसांची स्पेशल टीम घटनास्थळी पोहोचली आहे. ज्या ठिकाणी स्फोट झाला त्या ठिकाणापासून इस्त्रायली दूतावास 150 मीटर अंतरावर आहे. दरम्यान या स्फोटाच्या घटनेनंतर मुंबई, पुण्यासह राज्यात सुरक्षाव्यवस्था कडेकोट करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. 


उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ट्वीट करत म्हटलं आहे की, दिल्लीतील इस्त्रायली दूतावासाबाहेर झालेल्या स्फोटाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे गृहमंत्री आणि पोलिस महासंचालकांशी चर्चा करुन राज्यातील परिस्थितीचा आढावा घेतला. मुंबई, पुण्यासह राज्यात सुरक्षाव्यवस्था कडेकोट करण्याचे निर्देश दिले. राज्यातील जनतेनेही सतर्क राहून आपल्या आजूबाजूला संशयास्पद वस्तू अथवा हालचाल आढळून आल्यास पोलिसांना तात्काळ कळवावे, असं अजित पवारांनी म्हटलं आहे

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post