ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान साहित्य रवाना
नगर : ग्रामपंचायत निवडणुकीसाठी दि.15 जानेवारी रोजी मतदान होणार आहे. मतदान प्रक्रिंया सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासनाची तयारी पूर्ण झाली असून जिल्ह्यात 52 गावे संवेदनशील जाहीर करण्यात आली असून याठिकाणी अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात असणार आहे. जिल्ह्यातील 767 पैकी 53 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्याने 705 ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी मतदान होणार आहे. या या मतदानासाठी आज मतदान साहित्याचे मतदान केंद्रावर नियुक्त अधिकारी, कर्मचाऱ्यांना वितरण करण्यात आले. संबंधित कर्मचारी आजच पोलिस बंदोबस्तात संबंधित मतदान केंद्रावर रवाना झाले आहेत
Post a Comment