राम मंदिर निर्माणासाठी देवेंद्र फडणवीस यांनी दिला एक लाखांचा निधी
मुंबई: माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी अयोध्येतील राम मंदिर निर्माणासाठी देणगी दिली आहे. राम मंदिर निर्माण न्यासाचे कोषाध्यक्ष गोविंदगिरी महाराज यांच्याकडे त्यांनी निधी सुपूर्द केला.
प्रभू श्रीरामचंद्रांचे भव्य मंदिर अयोध्येत साकारले जातेय,ही आपल्या सर्वांसाठी स्वप्नपूर्तीच!
या राष्ट्रीय कार्यात एक कारसेवक म्हणून आज माझा खारीचा वाटा श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंद देव गिरी जी महाराज यांच्याकडे समर्पित करता आला,हे माझे भाग्य!
अशा भावना फडणवीस यांनी व्यक्त केल्या.
Post a Comment