आश्चर्य...'या' ग्रामपंचायतीच्या निवडणुकीतुन सगळ्याच उमेदवारांची माघार

 

माळेगांव ग्रामपंचायतीच्या निवडणुकीतून सगळ्याच उमेदवारांची माघारपुणे : ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे गोविंदभाई निवासस्थान ज्या ग्रामपंचायत हद्दीत आहे त्या बारामती तालुक्यातील माळेगाव ग्रामपंचायत निवडणुकीत सर्वच उमेदवारांनी माघार घेतली आहे. सोमवारी सगळ्याच उमेदवारांनी अर्ज माघारी घेतल्याने याठिकाणी आता निवडणुकच होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. भविष्यात माळेगाव नगरपंचायत होणार असल्याने तब्बल 77 जणांनी आपला उमेदवारी अर्ज माघारी घेतला आहे.

माळेगाव ग्रामपंचायत नगरपंचायत होणार असल्याने ग्रामपंचायतीची निवडणूक होणार नाही यावर शिक्कामोर्तब झाले आहे. दरम्यान, गावातील प्रमुखांनी एकत्र येत निवडणुक न लढवण्याचा निर्णय घेतला. मात्र प्रत्यक्ष उमेदवारांची समजूत काढताना गावपुढाऱ्यांची चांगलीच दमछाक झाली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post