मनपा स्थायी समितीतून 8 सदस्य होणार निवृत्त...नव्या इच्छुकांची मोर्चेबांधणी
नगर ः नगर महानगरपालिकेच्या स्थायी समितीचे 8 सदस्य 1 फेबु्रवारीला निवृत्त होत असून त्यांच्याजागी नवीन सदस्यांची निवड केली जाणार आहे. यासाठी नगरसचिव एस.बी.तडवी यांनी महासभा बोलविण्याचा प्रस्ताव महापौर बाबासाहेब वाकळे यांना सादर केला आहे. त्यामुळे आता महानगरपालिकेत पुन्हा राजकीय घडामोडी रंगणार असून स्थायीवर वर्णी लावण्यासाठी इच्छुकांची फिल्डिंग सुरु होणार आहे. निवृत्त होणार्या सदस्यांमध्ये मुद्दसर शेख, सुभाष लोंढे, सोनाली चितळे, सुवर्णा जाधव, योगीराज गाडे, कुमार वाकळे, आशा कराळे, गणेश भोसले या नगरसेवकांचा समावेश आहे. यात सर्वाधिक 3 सदस्य शिवसेनेचे असून भाजप व राष्ट्रवादीचे प्रत्येकी 2 व बसपाचा एक सदस्य निवृत्त होणार आहे. सदस्य निवडीच्या सभेत संबंधित पक्षाच्या गटनेत्यांकडून शिफारस होणार्या नावांवर महापौरांकडून शिक्कामोर्तब केले जाते. त्यामुळे आता संबंधितांनी आपापल्या पक्षाकडे मोर्चेबांधणी सुरु केली आहे.
Post a Comment