आदिवासींच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक दिनी ढोल ताशासह हलगी आंदोलन, लहूजी शक्ती सेनेचा इशारा

 आदिवासींच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक दिनी ढोल ताशासह हलगी आंदोलन, लहूजी शक्ती सेनेचा इशारानगर : आदिवासींच्या न्याय हक्कासाठी श्रीगोंदा पंचायत समिती कार्यालयासमोर मंगळवार दि,२६/१/२०२१ रोजी ढोल ताशा आणि हालगी आंदोलन  करण्याचा इशारा लहूजी शक्ती सेनेने दिला आहे.याबाबतचे निवेदन तहसीलदार, गट विकास अधिकारी, पोलिस निरीक्षक यांना देण्यात आले. यावेळी लहुजी शक्ती सेनाचे जिल्हा महासचिव संतोष  शिंदे, युवा जिल्हा अध्यक्ष उत्तम रोकडे, श्रीगोंदा तालुका अध्यक्ष नवनाथ शिंदे, तालुका सचिव वसंत अवचिते, सागर गायकवाड, सोमनाथ जाधव, संतोष बर्डे आदी उपस्थित होते.

आंदोलनाच्या आंदोलकांच्या मागण्या : 

हिंगणी दुमाला (तालुका श्रीगोंदा जिल्हा अहमदनगर) या ठिकाणी रहात असलेल्या आदिवासी 30 ते 40 कुटुंबांच्या घराच्या नोंदी ग्रामपंचायतनी तत्काळ लावण्यात यावेत,त्याठिकाणी शबरी घरकुल घरकुल योजना राबविण्यात यावी,  वस्ती गावापासून दूर असल्यामुळे  रस्त्याची, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात यावी त्याचबरोबर  लाईटची सोय करण्यात यावी. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post