कोठे यांना उद्धव ठाकरे यांनी हाकलले, शरद पवारांनी लगेच पंखाखाली घेतले
मुंबईः सोलापूर महापालिकेतील शिवसेना नगरसेवक आणि विरोधी पक्षनेते महेश कोठे यांची शिवसेनेतून कायमची हकालपट्टी करण्यात आल्यानंतर आता कोठेंनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय. महेश कोठे यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली होती. त्यांच्या राष्ट्रवादी प्रवेशावरून सेना-राष्ट्रवादीत काहीसा तणाव होता. हा प्रवेश लांबण्याची शक्यता होती. मात्र अखेर खुद्द शरद पवारांच्याच उपस्थितीत महेश कोठे हे राष्ट्रवादीत दाखल झाले आहेत.
खुद्द शरद पवारांनीच ट्विट करत महेश कोठेंनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्याची माहिती दिलीय.
Post a Comment