ओंकार भालसिंग खून प्रकरणात विश्वजीत कासारसह चौघांना अटक, एलसीबीची मोठी कामगिरी

 ओंकार भालसिंग खून प्रकरणात विश्वजीत कासारसह चौघांना अटक, एलसीबीची मोठी कामगिरीनगर : नगर तालुक्यातील वाळकी येथील ओंकार भालसिंग खून प्रकरणातील सराईत गुन्हेगार असलेला मुख्य आरोपी विश्वजीत रमेश कासार याला जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे. दि.१७ नोव्हेंबर २०२० रोजी घडलेल्या या गुन्ह्यानंतर कासार फरार झाला होता. त्याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने वाघोली (पुणे) येथून सापळा रचून अटक केली. त्यांच्यासह या गुन्ह्यातील त्याचे साथीदार मयूर बापूसाहेब नाईक (वय २०, या.वाळकी) व भरत भिमजी पवार यांनाही अटक करण्यात आली आहे. याशिवाय आरोपी कासार याला आश्रय देणारा संतोष अप्पासाहेब धोत्रे (या.कारेगाव, या.शिरूर) यालाही ताब्यात घेण्यात आले आहे.

पोलिस अधीक्षक मनोज पाटील, अप्पर पोलिस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, उपविभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोलिस निरीक्षक अनिल कटके यांच्या नेतृत्वाखाली सपोनि शिशिरकुमार देशमुख, पोसई गणेश इंगळे, पोलिस कर्मचारी भाऊसाहेब काळे, बाळासाहेब मुळीक, विजयकुमार वेठेकर, संदीप घोडके, सुरेश माळी, विशाल दळवी, संतोष लोंढे, संदीप पवार, शंकर चौधरी, दीपक शिंदे, रवीकिरण सोनटक्के, सचिन आडबल, देवेंद्र शेलार, कमलेश पाथरूट,योगेश सातपुते, संदीप  दरंदले, रणजित जाधव, राहुल सोळंके, संभाजी कोतकर, भरत बुधवंत, चंद्रकांत कुसळकर यांच्या पथकाने ही कामगिरी केली.0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post