भाऊसाहेब कबाडी यांना उपक्रमशील मुख्याध्यापक पुरस्कार

 *भाऊसाहेब कबाडी यांना उपक्रमशील मुख्याध्यापक पुरस्कार.* 



नगर : शिक्षण विवेक व डॉ.टी.बी.लुल्ला चॅरिटेबल फाउंडेशन सांगली यांच्या वतीने दिला जाणारा 'शिक्षण माझा वसा' युवा राज्यस्तरीय उपक्रमशील मुख्याध्यापक पुरस्कार २०२१  महानगरपालिका प्राथमिक शाळा ओंकारनगर केडगाव  शाळेचे मुख्याध्यापक भाऊसाहेब कबाडी यांना प्रदान करण्यात आला.स्वातंत्र्यवीर सावरकर अभ्यासन केंद्र डेक्कन पुणे येथे आयोजित पुरस्कार सोहळ्यात ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ अनिरुद्ध देशपांडे, लेखक शरद कुंटे, डॉ. टी.बी.लुल्ला चॅरिटेबल फाउंडेशनचे चेअरमन ऍड.किशोर लुल्ला, शिक्षण विवेकच्या कार्यकारी संपादक डॉ.अर्चना कुडतरकर, एचडीएफसी बँक मॅनेजर राहुल देशमुख यांच्या हस्ते भाऊसाहेब कबाडी यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.६००० रुपये रोख रक्कम, स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र व पुस्तके असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

   भाऊसाहेब कबाडी यांनी महानगरपालिकेच्या  ओंकारनगर प्राथमिक शाळेत नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून शाळेचा कायापालट केला आहे.त्यामुळेच ३५० पुरस्कार नामांकन प्रस्तावांमधून त्यांची या पुरस्कारासाठी निवड झाली आहे.

   नगरसेविका सुनिता कोतकर, नगरसेविक अमोल येवले, नगरसेविका शांताबाई शिंदे, नगरसेवक विजय पठारे,अहमदनगर मनपा शिक्षण विभागाचे प्रशासनाधिकारी सुभाष पवार, उपशिक्षणाधिकारी संजय मेहेर,माजी मनपा उपायुक्त रामकिसन देशमुख, पर्यवेक्षक जुबेर पठाण, केंद्र समन्वयक चंद्रशेखर साठे,एल.आय.सी.विकास अधिकारी तुषार देशमुख,पित्रोडा सेल्सचे परेश पित्रोडा, सप्तरंग प्रिंटवल्डचे नंदेश शिंदे, अवधूत मोबाईलचे अजित पवार,विषयतज्ञ अरुण पालवे,नपा व मनपा शिक्षक संघ राज्यसरचिटणीस अरुण पवार,मनपा शिक्षक संघाच्या अध्यक्षा मनिषा शिंदे,शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष प्रवीण मुळे, उपाध्यक्ष रवींद्र पानसरे, सहशिक्षक शिवराज वाघमारे, सहशिक्षिका वृषाली गावडे यांनी भाऊसाहेब कबाडी यांचे अभिनंदन केले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post