रेखा जरे यांच्या मुलाने केल्या 'या' महत्वाच्या मागण्या

 रेखा जरे खून प्रकरणाचा खटला जलदगती न्यायालयात चालवावा


अहमदनगर:  यशस्विनी ब्रिगेडच्या संस्थापक अध्यक्षा रेखा जरे यांच्या खून प्रकरणाचा खटला जलदगती न्यायालयात चालवावा तसेच  विशेष सरकारी वकील म्हणून उज्वल निकम  किंवा उमेशचंद्र यादव यांची नियुक्ती करण्यात यावी, अशा मागण्या जरे यांचा मुलगा रूणाल जरे यांनी सरकारकडे केल्या आहेत.जरे यांनी त्यांचे वकील अॅड. सचिन पटेकर यांच्या मार्फत पोलिस अधीक्षकांपासून निवेदन पाठवून ही मागणी केली आहे.या निवदेनाच्या प्रती मुख्यमंत्री, गृहमंत्री, पालकमंत्री यांच्यासह वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना पाठविण्यात आल्या आहेत.

 त्यांनी म्हटले आहे की, या गुन्ह्यातील अन्य आरोपींना अटक झाली आहे. मात्र, मुख्य सूत्रधार 


बाळ बोठे अजूनही फरार आहे. त्याचा अटकपूर्व जामीन जिल्हा न्यायालयाने फेटाळला आहे. तरीही तो अद्याप पोलिसांना सापडलेला नाही. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post