सेनापदक मिळालेल्या जवानाचा फोटोग्राफर्स बहुउद्देशीय विकास संस्थेच्या वतीने सन्मान

 सेनापदक मिळालेल्या जवानाचा फोटोग्राफर्स बहुउद्देशीय विकास संस्थेच्या वतीने सन्मान चिन्ह देऊन सत्कार

तीन दहशतवाद्यांचा खात्मा अहमदनगर- नगर तालुक्यातील डोंगरगण येथील भूमिपुत्र विकास वसंत पवार यांनी सैन्यदलात सेवा करताना तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घालुन सेना पदक मिळविले डोंगरगण( ता. नगर ) येथील भूमिपूत्र विकास वंसत पवार याचा फोटोग्राफर्स बहुउद्देशीय विकास संस्थेने त्याच्या कार्याची तसेच देशसेव प्रति असलेली आत्मीयतेचे दखल घेत सन्मान चित्र देऊन सपत्नीक सत्कार केला. नगर शहर व तालुक्यात सामाजीक उपक्रमात सहभाग घेणारी फोटोग्राफर्स बहुउद्देशीय संस्थेने विकास पवार यांच्या कार्याची दखल घेत डोंगरगण येथे त्यांच्या घरी जाऊन सत्कार करून संस्थेचे सन्मानचिन्ह देऊन सत्कार केला 

    १५ जानेवारी रोजी सेना दिनाच्या औचित्यावर भारतीय सेना प्रमुख जनरल मुकुंद नरवणे यांच्या हस्ते नवी दिल्ली येथील करिअप्पा परेड मैदानावर विकास पवार यांना सेनापदक  प्रदान करण्यात आले.

    डिसेंबर महिन्यात हवालदार विकास पवार हे जम्मू काश्मीर येथे प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर कर्तव्य बजावत असताना पाच जवानांच्या टीमचे नेतृत्व करत होते. त्यावेळी सीमारेषा ओलांडून भारतीय हद्दीत प्रवेश करण्याच्या तयारीत असलेल्या तीन दहशतवाद्यांना हवालदार पवार यांनी यमसदनी धाडले. त्यांच्या या पराक्रमाबद्दल त्यांना सेनापदक देऊन गौरविण्यात आले

    विकास पवार हे मुळचे जेऊर येथील चाफेवाडी चे रहिवासी आहेत. नगर तालुक्याच्या भूमिपुत्राने देशाची सेवा बजावताना केलेल्या धाडसी कार्याचे कौतुक करण्यासाठी त्यांचा सत्कार सोहळा आयोजित केल्याची माहिती संस्थेचे सचिव , राहुल जोशी,मच्छिंद्र इंगळे यांनी दिली. या ठिकाणी नुकतेच सेवानिवृत्त झालेले श्री. चंद्रकांत कदम, श्री. सदाशिव पवार, सपत्नीक आई वडिल उपस्थित होते. यावेळी विकास पवार यांनी दहशतवाद्यांचा खात्मा करताना केलेल्या घटनेचे चित्तथरारक प्रसंग ग्रामस्थांना सांगितले.

     यावेळी रणजीत कर्डिले , शिवम चेमटे ,उपेंद्र कर्पे, नागेश सोनवणे , संदिप सोनवणे, मंगेश पाटेकर , सचिन खटावकर , सुनिल शिरसुल , गणेश गायकवाड , प्रविण सांगळे ,सतिष पवार, बाबा सय्यद  उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post