एक फेब्रुवारीला सर्वात स्वस्त स्मार्टफोनचे लॉन्चिंग

 itel एक फेब्रुवारीला त्यांचा नवीन स्मार्टफोन लाँच करणारमुंबई : स्मार्टफोन निर्माती कंपनी itel एक फेब्रुवारीला त्यांचा नवीन स्मार्टफोन लाँच करणार आहे. हा स्मार्टफोन प्रिमियम लुक आणि HD+ डिस्प्लेसह सादर केला जाणार आहे. विक्रीसाठी एक्सक्लूझिव्हली Amazon या ई-कॉमर्स साईटवर हा स्मार्टफोन उपलब्ध केला जाणार आहे. रेंडर इमेजनुसार कंपनी हा स्मार्टफोन A-सिरीजअंतर्गत लाँच करणार आहे. यामध्ये 5.5 इंचांची मोठी स्क्रीन सोबत डुअल सिक्योरिटी फिचर देण्यात आलं आहे. यामध्ये 2GB रॅम आणि 32GB स्टोरेज स्पेस देण्यात आली आहे.

या स्मार्टफोनची किंमत 6 हजार रुपये किंवा त्यापेक्षा कमी असू शकते. किफायतशीर स्मार्टफोनच्या बाबतीत itel कंपनी एक स्ट्राँग ब्रँड बणली आहे. कंपनीने नुकताच एक Vision1 PRO स्मार्टफोन लाँच केला आहे. सोबतच कंपनीने 7 हजार रुपयांच्या स्मार्टफोन्सच्या सेगमेंटवर मजबूत पकड मिळवली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post