अण्णा हजारे, पोपट पवारांच्या गावातच बिनविरोध निवडणूक होणार नाही

आदर्श गावांतच बिनविरोधला आडकाठी, राळेगणसिद्धी, हिवरे बाजार ग्रामपंचायतीसाठी निवडणूक होणारनगर : बिनविरोध निवडणुकांसाठी राज्यात ओळखल्या जाणाऱ्या नगर जिल्ह्यातील आदर्श गावातच यंदा ग्रामपंचायतीची निवडणूक होणार आहे. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या राळेगणसिद्धी गावात काही दिवसांपूर्वी सर्वानी हजारे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत निवडणूक बिनविरोध करण्याचं जाहीर केले. परंतु शेवटपर्यंत एकमत न होऊ शकल्यामुळे राळेगणसिद्धी गावात निवडणूक रंगणार आहे. नगर तालुक्यातील आदर्श गाव हिवरे बाजार येथेही यंदा निवडणूक होणार आहे.

ग्रामपंचायत निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. निवडणूक जाहिर होताच आमदार नीलेश लंके यांनी ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करा 25 लाखांचे बक्षीस देण्याचे जाहीर केले होते. त्यासाठी नगरसह पारनेर तालुक्यातील गावोगावच्या पुढार्‍यांच्या बैठका घेतल्या. त्याला काही प्रमाणात यशही मिळालं.

आदर्श गाव योजनेचे राज्य कार्याध्यक्ष पोपट पवार यांचे हिवरेबाजार हे गाव तीस वर्षांपासून बिनविरोध होत आहे. परंतु, यंदा या गावातही निवडणूक होणार आहे. पद्मश्री पोपटराव पवार हे सातव्यांदा ग्रामपंचायत निवडणुकीत उतरले असून त्यांनाही निवडणुकीला सामोरे जावे लागणार आहेत. 0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post