तुमच्याकडे 'इतकी' वर्षे जुनी गाडी असेल तर भरावा लागेल 'ग्रीन टॅक्स'


जुन्या वाहनांवर आता ग्रीन टॅक्स, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे पाऊलनवी दिल्ली : वाढते प्रदूषण व वाहनांची संख्या पाहता केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी वातावारण प्रदूषित करणाऱ्या जुन्या वाहनांकडून आता ग्रीन टॅक्स आकारण्याचा प्रस्ताव दिला आहे. औपचारिक स्वरुपात हा कर लागू करण्यापूर्वी तो राज्य सरकारांच्या सल्लामसलतीसाठी पाठवण्यात आल्याची माहिती रस्ते वाहतूक मंत्रालयानं दिली आहे. 8 वर्षांपेक्षा जुन्या ट्रान्सपोर्ट व्हेईकल्सवर फिटनेस प्रमाणपत्राच्या नुतनीकरणादरम्यान 10 ते 25 टक्क्यांपर्यंत ग्रीन टॅक्स लावला जाऊ शकतो.

15 वर्षांपेक्षा जुन्या पर्सनल व्हेईकल्सवरही हा टॅक्स लावला जाणार आहे. तर पब्लिक ट्रान्सपोर्ट व्हेईकल्स म्हणजे सिटी बस अशा प्रकारच्या वाहनांना हा कर कमी प्रमाणात असेल. 

 हायब्रिड, इलेक्ट्रिक व्हेईकल्स आणि अल्टरनेट फ्यूल व्हेईकल्स जसं की सीएनजी, इथेनॉल, एलपीजी अशा इंधनांवर चालणाऱ्या गाड्यांवर हा टॅक्स लावला जाणार नाही. त्याचबरोबर शेतीच्या कामासाठी वापरल्या जाणाऱ्या म्हणजे ट्रॅक्टर, हार्वेस्टर, टिलर अशा वाहनांवरही ग्रीन टॅक्स लावला जाणार नसल्याची माहिती रस्ते वाहतूक विभागानं दिली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post