तुर्तास ग्रामसभा होणार नाही, ३१ मार्चपर्यंत स्थगिती

 तुर्तास ग्रामसभा होणार नाही, ३१ मार्चपर्यंत स्थगिती

 


नगर : यावर्षी २६ जानेवारीला ग्रामसभा होणार नाही, ३१ मार्चपर्यंत ग्रामसभांना स्थगिती दिली जाणार, निवडणूक पार पडलेल्या १४२३४ ग्रामपंचायतीत नवीन सदस्यांची सत्ता स्थापन होईपर्यंत ग्रामसभांना स्थगिती दिली जाणार, राज्य सरकार उद्या राज्य मंत्रीमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात येईल. महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनच्या  शिष्टमंडळाने आजच मुंबईत ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची भेट घेऊन ग्रामसभा तुर्तास न घेण्याची विनंती केली. त्याची पार्श्वभूमी पटवून दिल्याबद्दल  मंत्री मुश्रीफ यांनी ग्रामसभा 31 मार्च पर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय घेतलेला आहे.संघटनेच्या प्रयत्नाला यश आलेला आहे.त्याबद्दल सकाळपासून राज्याध्यक्ष राज्य सरचिटणीस व  राज्य कोषाध्यक्ष या ठिकाणी ठाण मांडून होते. दिवसभर पाठपुरावा झाल्यामुळे  या प्रयत्नाला यश आलेले आहे, अशी माहिती युनियनचे राज्य अध्यक्ष एकनाथ ढाकणे, सरचिटणीस  प्रशांत जामोद व संजीव निकम यांनी दिली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post