अरे देवा...बिस्कीट समजून गोवर्या मागवल्या, खाल्ल्यावर रिव्ह्यु ही दिला
अमेझॉन या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरून अनेक लोक वेगवेगळ्या वस्तू, खाद्यपदार्थ ऑर्डर करत असतात. या वस्तू वापरल्यानंतर ग्राहक त्याबाबत आपला रिव्ह्यू येथे पोस्ट करत असतात. सध्या अशाच एका ग्राहकाचा रिव्ह्यू सोशल मीडियावर व्हायरल झाला असून वाचणारेही अवाक होत आहे.
‘आज तक’ने दिलेल्या वृत्तानुसार, एका व्यक्तीने अमेझॉनवरून बिस्किट समजून शेणाच्या गोवऱ्या ऑर्डर केल्या. विशेष म्हणजे त्या व्यक्तीने त्या खाल्ल्या देखील आणि खाल्ल्यानंतर त्याने रिव्ह्यू देखील दिला. हा रिव्ह्यू संजय अरोडा नावाच्या एका डॉक्टरने ट्विटरवर शेअर केला आहे.
रिव्ह्यूमध्ये ग्राहकाने नमूद केले की, ‘याची चव अत्यंत खराब आहे. जेव्हा मी याचा घास खाल्ला तेव्हा गवत आणि मातसारखी याची चव लागली. यानंतर मला जुलाबाचा त्रास झाला. याचे उत्पादन घेणाऱ्या कंपनीला माझे निवेदन आहे की पदार्थ बनवताना साफ-सफाईकडे लक्ष द्या. तसेच याची चव आणि कुरकुरीतपणा याकडेही लक्ष्य द्या.’
Post a Comment