सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या समितीत नगर जिल्ह्यातील शेतकरी नेत्याचा समावेश

सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या समितीत अनिल घनवट नवी दिल्ली:  केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांच्या अंमलबजावणीस स्थगिती देताना सर्वोच्च न्यायालयाने कृषी कायद्याची समीक्षा करण्यासाठी चार सदस्यांची समिती स्थापन केली आहे.  समितीत शेतकरी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल घनवट यांच्या रुपाने  नगर जिल्ह्यातील शेतकरी नेत्याला स्थान मिळाले आहे. . या समितीत भारतीय किसान यूनियनचे नेते भूपिंदर सिंह मान, आंतरराष्ट्रीय खाद्य नीती संस्थेचे डॉ. प्रमोदकुमार जोशी, कृषी अर्थतज्ज्ञ अशोक गुलाटी आणि शेतकरी संघटनेचे नेते अनिल घनवट यांचा समावेश आहे. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post