तीन गावठी कट्टे व काडतुसे बाळगणारा सराईत गुन्हेगार अटकेत

 तीन गावठी कट्टे व काडतुसे बाळगणारा सराईत गुन्हेगार अटकेतनगर: अहमदनगर जिल्हयात होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने पोलिस अधीक्षक मनोज पाटील  यांनी अवैध अग्नीशस्त्र धारकांवर कडक कारवाई करणेबाबत आदेशीत केले होते. त्यासंदर्भाने माहिती घेत असताना एलसीबीचे पोलिस निरीक्षक अनिल कटके यांना गोपनिय माहिती मिळाली की, गुंजाळे, ता. राहुरी येथे एक इसम  पप्पु चेंडवाल हेहा देशी बनावटीचे गावटी कट्टा पिस्तुल बेकायदेशिर, विनापरवाना स्वतःजवळ बाळगत आहे. त्यानुसार सपोनि शिशिरकुमार देशमुख, सपोनि राजेंद्र सानप, पोसई/गणेश इंगळे, पोहेकॉ/भाऊसाहेब काळे, विजयकुमार वेठेकर, संदीप घोडके, पोना विशाल दळवी, शंकर चौधरी, ज्ञानेश्वर शिंदे, रविकिरण सोनटक्के,दिपक शिंदे पोकॉ रोहित येमुल, मच्छिद्र बर्डे, विजय धनेधर, मयुर गायकवाड, रविंद्र डुंगासे, मपोकों/ज्योती शिंदे व चापोहेकॉ/ उमाकांत गावडे यांच्या पथकाने सापळा लावुन पप्पु ऊर्फ अशोक बाबासाहेब चेंडवाल (वय २४,रा. गुंजाळे, ता. राहुरी. जिल्हा अहमदनगर) यास ताब्यात घेऊन त्याचे कब्जातून तीन देशी बनावटीचे गावठी कट्टेपिस्तुल व तीन जिवंत काडतुसे असे एकुण ९१,५००/रु. किंमतीचा मुद्देमाल जप्त केला.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post