वेगळीच गंमत...जिंकल्याचा जल्लोष केल्यानंतर तीन ‌दिवसांनी कळलं पराभव झाला...

मतमोजणी प्रतिनिधीची झाली गल्लत, जल्लोष केल्यानंतर तीन ‌दिवसांनी कळलं पराभव झालाय 

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील भंगाराम-तळोधी ग्रामपंचायतीत निकालानंतर एक वेगळिच प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे हा सर्व प्रकार प्रशासनाच्या चुकीने नाही तर उमेदवाराच्या अतिउत्साही प्रतिनिधीमुळे झाला आहे.

 भंगाराम-तळोधी ग्रामपंचायतीची सोमवारी मतमोजणी झाली. प्रभाग क्रमांक 4 मधीरल उमेदवार कमलेश गेडाम यांनी व त्यांच्या समर्थकांनी निकालानंतर मोठा जल्लोष केला. मात्र आज ते निर्वाचन अधिकाऱ्याकडे विजयी झाल्याचे प्रमाणपत्र आणायला गेले असता ते पराभूत झाल्याचे त्यांना सांगण्यात आले.

या प्रकारामुळे कमलेश गेडाम हे  गोंधळून गेले. मात्र तहसीलदार कमलाकर मेश्राम यांनी त्यांना अंतिम निकाल, मिळालेली मतं आणि वस्तुस्थिती समजावून सांगितली. बॅलेट मशीन वरचे आकडे नीट न पाहता उमेदवाराचा प्रतिनिधी उत्साहाच्या भरात मतमोजणी केंद्राचा बाहेर पडला आणि त्यामुळे हा गोंधळ झाल्याची शक्यता आहे.

विशेष म्हणजे कमलेश यांच्या विरोधात उभ्या असलेल्या मनोज सिडाम या उमेदवाराने देखील मतमोजणी केंद्रावर जाऊन आपल्याला किती मतं पडली याची खात्री केली नाही. आणि स्वतःला पराभूत समजून घरचा रस्ता गाठला. पण आता वस्तुस्थिती समोर आल्यावर या निकालाची सर्वत्र चर्चा रंगली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post