बिनविरोध 'मेंबर' झाल्याचा जल्लोष करण्यापूर्वी थांबा... राज्य निवडणूक आयोगाने जिल्हाधिकारी यांना दिले 'हे'निर्देश

 

जिल्हाधिकार्यांच्या अहवालानंतरच बिनविरोध उमेदवारांना मान्यता; राज्य निवडणूक आयोग



मुंबई : काही ग्रामपंचायतींनी सरपंचाच्या पदाचा लिलाव करून बोली लावल्याचं समोर आलं होतं. यासंदर्भात निवडणूक आयोगानं कडक पाऊल उचललं आहे. सरपंचपदाच्या लिलावांबाबत होत असलेल्या तक्रारींसंदर्भात राज्य निवडणूक आयोगास स्वयंस्पष्ट अभिप्रायासह अहवाल सादर करण्याचे आदेश सर्व जिल्हाकाऱ्यांना देण्यात आले आहेत, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान यांनी दिले आहे. मदान यांनी सांगितले की, सरपंचपदाचा लिलाव होत असून त्यासाठी मोठ्या रकमेची बोली लावण्यात येत आहे, अशी तक्रार आयोगाकडे आली आहे. ग्रामपंचायतींच्या निवडणुका मुक्त, निर्भय व पारदर्शक वातावरणात पार पाडण्याच्यादृष्टीने ही बाब गंभीर आहे. त्यामुळे  जिल्ह्यात अशा स्वरूपाच्या घटना घडल्या असल्यास त्यांची सखोल चौकशी करून स्वयंस्पष्ट अभिप्रायासह अहवाल सादर करावा. हा अहवाल बिनविरोध विजयी होणाऱ्या उमेदवारांचा निकाल प्रसिद्ध करण्यासाठी 23 डिसेंबर 2004 च्या आदेशानुसार आयोगाकडे परवानगी माच सादर करावा, असे निर्देश आयोगाने जिल्हाधिकार्यांना दिले आहेत. त्यामुळे आता ग्रामपंचायत निवडणुकीत बिनविरोध झालेल्या उमेदवारांना अधिकृत निवड जाहीर होण्यासाठी काही काळ प्रतिक्षा करावी लागेल.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post