उमेदवारच नसल्याने सरपंच आरक्षण बदलून मिळावे, 'या' ग्रामस्थांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

 उमेदवारच नसल्याने सरपंच आरक्षण बदलून मिळावे, धनगरवाडी ग्रामस्थांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन



नगर :  नगर तालुक्यातील धनगरवाडी येथील सरपंचपदाचे आरक्षण अनुसुचित जमाती स्त्री वर्गासाठी निघाले. मात्र या प्रवर्गातील उमेदवार नसल्यामुळे या आरक्षणात बदल करावा या मागणीचे निवेदन धनगरवाडी येथील ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयात दिले आहे .

धनगरवाडी ( ता.नगर ) येथील ग्रामपंचायतीची निवडणुक मुकतीच पार पडली . काल दि. २८ रोजी सरपंचपदाचे आरक्षण जाहीर करण्यात आले . यात अनुसुचित जमाती स्त्री वर्गासाठी सरपंचपदाचे आरक्षण पडले . या पदासाठी एकही जागा नसल्याने त्या प्रवर्गातील उमेदवारच नाही . सरपंच पदाचे आरक्षण पडलेल्या प्रवर्गातील उमेदवार नसल्याने सरपंचपद पाच वर्ष रिक्त राहणार आहे . मागील पंचवार्षाक निवडणुकीतही याच प्रवर्गतील जागा उमेदवाराअभावी रिक्त होती .सरपंचपद रिक्त राहिल्यास गावच्या विकासात अडचणी निर्माण होणार आहे .पर्यायी गावचा विकास खुंटणार नाही तरी जिल्हाधिकारी यानी याचा विचार करून सरपंचपदाच्या आरक्षणात नियमामुसार बदल करावा . असे निवेदन संदिप शिकारे, प्रविण शिकारे, सचिन शिकारे, निलेश शिकारे, अर्जुन शिकारे, सुनिल शिकारे, विशाल शिकारे, अशोक शिकारे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात दिले आहे

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post