राम मंदिर निर्माणासाठी विशाल गणपती देवस्थान ट्रस्टची १ लाख ११ हजार १११ रूपयांची देणगी
नगर- अनेक वर्षांच्या संघर्षानंतर आयोध्येत श्रीराम मंदिर निर्माण कार्यास शुभारंभ झाला ही जगभरातील हिंदूंसाठी अभिमानास्पद गोष्ट आहे. प्रभु रामचंद्रांच्या मंदिर निर्माणात सर्वांचा सहभाग असावा, यासाठी मंदिर निर्माण समितीच्यावतीने मोठ-मोठ्या शहरांपासून गावपातळीवरील भाविकांचा हातभार असावा या उद्देशाने मदत निधी संकलन सुरु केले आहे. या कार्यात नगरमधील जास्तीत-जास्त श्रीराम भक्तांना सहभागी व्हावे, असे आवाहन महंत हभप भास्करगिरी महाराज यांनी केले.
आयोध्या येथील श्रीराम मंदिर निर्माण कार्यासाठी नगरमधून निधी संकलन अभियानाचा शुभारंभ शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणेश मंदिर देवस्थानच्यावतीने रु. 1 लाख 11 हजार 111 रुपयांचा धनादेश अध्यक्ष अॅड.अभय आगरकर यांच्या हस्ते हभप भास्करगिरी महाराज यांच्याकडे सुपूर्द करुन करण्यात आला. याप्रसंगी देवस्थानचे उपाध्यक्ष पंडितराव खरपुडे, सचिव अशोकराव कानडे, महंत संगमनाथ महाराज, रामकृष्ण राऊत, विजय कोथिंबीरे, पांडूरंग नन्नवरे, रंगनाथ फुलसौंदर, चंद्रकांत फुलारी, गजानन ससाणे आदि उपस्थित होते.
यावेळी महंत संगमनाथ महाराज यांनी 11,111, विश्वस्त विजय कोथिंबीरे 11,111, सचिव अशोकराव कानडे 5,555 आदिंसह भाविकांनी देणगी दिली. कार्यक्रमास डॉ.रविंद्र साताळकर, राजाभाऊ मुळे, शांतीभाई चंदे, वसंत लोढा, गजेंद्र सोनवणे, अनिल रामदासी, श्रीकांत जोशी, आबा मुळे, हिराकांत रामदासी, संजय चाफे, विक्रम राठोड, सचिन पारखी, नंदकिशोर शिकरे आदि उपस्थित होते.
Post a Comment