अनेक खेळाडू जायबंदी, विरेंद्र सेहवाग उतरणार मैदानात!
बॉर्डर-गावसकर कसोटी मालिका सध्या १-१ अशी बरोबरीत आहे. ब्रिस्बेन येथे चौथा आणि निर्णायक कसोटी सामना होणार आहे. मात्र, भारतीय संघ दुखापतीमुळे बेजार झाला आहे. एकापाठोपाठ एक खेळाडू दुखापतग्रस्त झाल्याच्या बातम्या समोर येत आहेत. भारतीय संघातील आतापर्यंत ९ खेळाडू दुखापतग्रस्त झाले आहेत. सिडनी कसोटीमध्ये जसप्रीत बुमराह क्षेत्ररक्षणादरम्यान दुखापतग्रस्त झाला होता. त्यातच आता मयांक आणि आर. अश्विन यांनाही दुखापत झाल्याचं समोर आलं. अशामध्ये संघ व्यवस्थापनाला भारतीय संघ निवडताना अडचण होत आहे. भारतीय संघाचा माजी विस्फोटक खेळाडू विरेंद्र सेहवागनं याच संधीचा फायदा घेत एक मजेशीर ट्विट केलं आहे. यामध्ये त्यानं चौथ्या कसोटीत खेळण्याची तयारी दर्शवत बीसीसीआयला तशी ऑफर दिलं आहे.
सेहवागनं दुखापतग्रस्त खेळाडूंचा एक फोटो पोस्ट केला आहे. तसेच फोटोवरती मजेशीर असं कॅप्शन लिहीत ट्विट केलं आहे. 'इतके खेळाडू दुखापतग्रस्त झाले आहेत. जर ११ जणांची भरती होत नसेल तर ऑस्ट्रेलियाला जायला तयार आहे. बीसीसीआयनं विलगीकरणाचं पाहवं.' सेगावगचा हा अंदाज अनेकांना आवडला आहे.
Post a Comment