ऑनलाईन ओळखीतून व्यवसाय करायला गेला आणि १४ लाख गमावले

 

ऑनलाईन ओळखीतून व्यवसाय करायला गेला आणि १४ लाख गमावले


नगर : आयुर्वेदिक कच्चा माल, हर्बल ऑइल खरेदीच्या बहाण्याने बनावट ई-मेलद्वारे ऑनलाइन व्यवहारात केडगाव येथील एकास १४ लाख १७ हजार ५०० रुपयांना गंडा घालण्यात आला. १३जुलै ते २ नोव्हेंबर २०२० या काळात हा प्रकार झाला. याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.याबाबत ओंकार भालेकर (वय३०, रा. केडगाव) यांनी सायबर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. भालेकर यांच्याशी विविध बँकांच्या पाच खातेदारांनी, खोटी ओळख सांगून हर्बल प्रॉडक्ट कंपनीकडून आयुर्वेदिक कच्चा माल, हर्बल ऑइल खरेदी करण्यास सांगितले. बनावट ई-मेलद्वारे खोटी कागदपत्रे पाठवून ऑनलाइन व्यवहारात १४ लाख १७ हजार ५०० रुपयांची फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

भालेकर यांच्या फिर्यादीनुसार पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, आरोपींचा शोध सुरू करण्यात आला आहे.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post