सिरमची 'कोविशिल्ड' ठरणार भारतीयांसाठी तारणहार, आपत्कालीन वापरास मंजुरी
नवी दिल्ली : कोरोना लसीची प्रतीक्षा आता संपुष्टात येताना दिसत आहे. कारण, ऑक्सफर्ड आणि अॅस्ट्राजेनिका या कंपनीनं विकसित केलेल्या ‘कोविशिल्ड’ या कोरोना लसीला मान्यता मिळाली आहे. कोव्हिशिल्ड लसीच्या आपत्कालिन वापराला मंजुरी मिळाली आहे. तज्ज्ञांच्या समितीने हिरवा कंदील दाखवला. या लसीचं उत्पादन पुण्यातल्या सीरम इन्स्टिट्युटमध्ये सुरु आहे.
कोविशिल्ड या कोरोना लसीनं तिन्ही टप्प्यातील चाचण्या पूर्ण केल्या आहे. चाचण्यांदरम्यान ही लस 90 टक्क्यांपर्यंत यशस्वी ठरली होती. मात्र, महिनाभराच्या अंतरानं या लसीचे 2-3 डोस घेतल्यास ही 95 टक्क्यांपर्यंत यशस्वी ठरते, असं सीरम इन्स्टिट्युटचे सीईओ अदर पुनावालांनी स्पष्ट केलं आहे.
पुनावाला यांनी आपल्याकडे 7.50 कोटी डोस तयार असल्याची माहिती दिली. लशीला परवानगी मिळताच पुढच्या आठवड्याभरात 100 मिलियन म्हणजे 10 कोटी डोस तयार असतील, असं त्यांनी सांगितलं आहे.
Post a Comment