१४६ जिल्ह्यात आठवडाभरापासून नवीन करोना रूग्ण नाही

 

देशात करोना संसर्गाला मोठा ब्रेक, महाराष्ट्र, केरळमध्ये चिंता कायमनवी दिल्ली :  देशातील करोना संसर्गाचा वेग मंदावला आहे. याशिवाय बऱ्या होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत सतत वाढ होत आहे. दुसरीकडे सरकारची कोरोना लसीकरण मोहिम, या सर्व कारणांमुळे भारताची कोरोनामुक्तीकडे वाटचाल सुरु असल्याचं दिसत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आज पत्रकार परिषदेत कोरोना लसीच्या लसीकरण्याच्या मोहिमेवर भाष्य केलं आहे. “भारतात जलद गतीने कोरोना लसीकरण अभियान सुरु आहे. आतापर्यंत एकूण 25 लाख लोकांना लस टोचण्यात आली आहे”, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने पत्रकार परिषदेत दिली आहे.

देशात सध्या 1 लाख 75 हजार कोरोनाबाधित रुग्ण सक्रिय आहेत. भारतात सर्वात वेगाने 10 लाख लोकांना कोरोनाची लस टोचण्यात आली आहे”.दरम्यान, भारताला कोरोना संसर्गाला रोखण्यात बऱ्यापैकी यश आल्याचं केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन आज मंत्र्यांसोबतच्या 23 बैठकीत म्हणाले. “देशातील 146 जिल्ह्यांमध्ये गेल्या सात दिवसांपासून एकही नवा कोरोनाबाधित रुग्ण आढळलेला नाही. याशिवाय 18 जिल्ह्यांमध्ये गेल्या 14 दिवसांपासून एकही नवा रुग्ण आढळलेला नाही. सहा जिल्ह्यांमध्ये 21 दिवसांपासून तर 21 जिल्ह्यांमध्ये 28 दिवसांपासून कोरोनाचा एकही नवा रुग्ण आढळलेला नाही”, असं हर्षवर्धन यांनी सांगितलं.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post