कोचिंग क्लासेस सुरु करण्यास परवानगी मिळावी जिल्हाधिकार्यांना प्रोफेशल टिचर्स असो.चे निवेदन
नगर - मागील दहा महिन्यांपासून कोरोनामुळे बंद असणारे कोचिंग क्लासेस सुरु करण्यास परवानगी मिळावी, या मागणीचे निवेदन प्रोफेशल टिचर्स असोसिएशनच्यावतीने जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांना देण्यात आले. याप्रसंगी जिल्हाध्यक्ष प्रा.बाळासाहेब किर्तने, रोहित रामदिन, प्रा.आनंद पोळ, प्रा.विजय शेठे, प्रा.सच्चिदानंद घोणसे, प्रा.रविंद्र काळे, प्रा.विजय कांडके, प्रा.प्रकाश जोशी, प्रा.श्रीकांत सोनटक्के, प्रा.विवेक धर्माधिकारी, प्रा.किरण कालरा, प्रा.भगवान गवते, प्रा.संदिप घुमरे आदि उपस्थित होते.
जिल्हाधिकारी यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कोविड 19 मुळे मागील दहा महिन्यांपासून कोचिंग क्लासेस बंद आहेत. अनलॉकची प्रक्रिया सुरु झाली असून अनेक क्षेत्रांचे व्यवहार पूर्ववत सुरु झाले आहेत. हे एकमेव क्षेत्र अद्याप अनलॉक झालेले नाही. त्यामुळे स्वयंरोजगार मिळविलेले लाखो युवक बेरोजगार झाले आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांनाही निवेदन देण्यात आलेले आहे. अहमदनगर जिल्ह्यातील परिस्थिती नियंत्रणात आहे. मागील एक महिन्यांपासून शाळा सुरळीत सुरु असून, त्यामध्ये कोविड पेशंट आढळून आलेले नाही. तसेच पुणे महानगरपालिका आयुक्त यांनी कोचिंग क्लासेस सुरु करण्यास परवानगी दिली आहे. अहमदनगरमध्ये त्या अनुषंगाने कोचिंग क्लासेसला परवानगी देण्यास काही हरकत नसावी.
उच्च शिक्षण घेऊनही नोकरी मिळत नसल्याने अनेक बेरोजगार युवकांनी क्लासेस सुरु केले आहे. त्यासाठी जागा भाडे, इतरही अनेक गोष्टींसाठी कर्ज काढून गुंतवणुक केलेली आहे. परंतु क्लासेस बंद असल्याने उपासमारीची वेळ आली आहे.
आजमितीला कोचिंग क्लासेस हा व्यवसाय 40 टक्के पूर्ण बंद झाला असून, अनेक क्लासेसवाले नैराशातून आत्महत्येचा विचार करत आहेत. याबाबत लवकर निर्णय घ्यावा, अन्यथा तीव्र स्वरुपाचे आंदोलन छेडण्यात येईल, असेही निवेदनात म्हटले आहे.
यावेळी प्रा.राजेश मुंडे, प्रा.बेळगे, प्रा.सांगळे, प्रा.अशोक काळे, प्रा.महाले, प्रा.मनोज पाटील, अविनाश जाधव आदिंसह कोचिंग क्लासेसमधील शिक्षक उपस्थित होते.
Post a Comment