धनंजय मुंडे अडचणीत आल्यानंतर पंकजा मुंडेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाची चर्चा, जयंत पाटील यांनी दिली प्रतिक्रिया

 धनंजय मुंडे अडचणीत आल्यानंतर पंकजा मुंडेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाची चर्चा, जयंत पाटील यांनी दिली प्रतिक्रिया



मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे  मंत्री धनंजय मुंडे आणि नवाब मलिक अडचणीत आले आहेत. धनंजय मुंडे यांनी आपले विवाहबाह्य संबंध आहेत, तसंच या संबंधातून आपल्याला दोन मुलं आहेत, अशी कबुली दिली. तसंच धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचा आरोप करण्यात येत आहे. तर दुसरीकडे नवाब मलिक यांच्या जावयाला एनसीबीने ड्रग्ज प्रकरणात नाव समोर आल्यामुळे अटक केली आहे.राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी याबाबत पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडली. 'आम्ही कोणीही याप्रकरणात हस्तक्षेप करणार नाही. धनंजय मुंडे यांनी याबाबत खुलासा केला आहे. भाजप वेगवेगळ्या मागण्या करत आहेत, हे भाजपचं काम आहे, पण मंत्रिमंडळात फेरबदलाची आवश्यकता नाही, वरिष्ठ नेते याबाबत निर्णय घेतील,' असं जयंत पाटील म्हणाले.

'नवाब मलिक यांच्या जावयाला झालेल्या अटकेबाबत फार माहिती नाही, पण सरकार यात हस्तक्षेप करणार नाही. दोन्ही विषय पोलिसांकडे आहेत, त्यांनी निपक्ष चौकशी करावी. 

पंकजा मुंडे राष्ट्रवादीत प्रवेश करण्याबाबतची चर्चा सुरु झाली आहे? त्याबाबत  जयंत पाटील यांनी “माझ्यापर्यंत तर तशी कोणतीही चर्चा आलेली नाही” असं उत्तर दिलं.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post