स्वयंपाक न केल्याच्या कारणावरून खून, काही तासांतच आरोपी अटकेत

स्वयंपाक न केल्याच्या कारणावरून खून, काही तासांतच आरोपी अटकेतनगर : नगर शहरानजीक केडगाव - निंबळक बायपास रोडच्या कडेला असलेल्या उड्डाणपुलाजवळ एकाचा खुन केल्याची घटना घडली आहे.  निंबळक ते केडगाव बायपास रोडच्या कडेला रेल्वे उड्डाणपुलाजवळ फिर्यादी अशोक रामस्वरूप निसाद (वय 35, धंदा स्क्रॅप बाजार) यांचे दुकान आहे. फिर्यादी अशोक निसाद यांच्याकडे आरोपी महेश सिवराम निसाद व मयत बाबादिन झंडु निसाद हे दोघे कामाला आहेत. शनिवार दि. 16 जानेवारी रोजी रात्री 2 वाजताच्या सुमारास दुकानात  महेश निसाद याने दुसरा कामगार बाबादिन निसाद हा स्वयंपाक करत नाही याकारणावरून त्याच्यासोबत भांडण करून त्याला लोखंडी गजाने मारहाण केली. 


 बाबादिन निसाद याच्या उजव्या पायाच्या नडगीवर तसेच डाव्या हाताच्या दंडावर मारहाण करून गंभीर दुुखापत केली. त्या दुखापतीत बाबादिन निसाद हा मयत झाला. आरोपी महेश निसाद यास तोफखाना पोलिसांनी अटक केली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक मुंढे हे करत आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post