अंडी व पोल्ट्री मांस खाणे पूर्णतः सुरक्षित, बर्ड फ्ल्यू बाबत अफवांवर विश्वास नको

 अंडी व पोल्ट्री मांस खाणे पूर्णतः सुरक्षित, बर्ड फ्ल्यू बाबत अफवांवर विश्वास नको : सुनिल केदारमुंबई: राज्यात बर्डफ्ल्युमुळे मुळे पक्ष्यांचा मृत्यू झाल्याचे आढळले नाही. अंडी व कुक्कुट मांस ७० अंश सेंटीग्रेड तापमानावर ३० मिनिटे शिजवल्यास विषाणू निष्क्रीय होत असल्याने अंडी व पोल्ट्री मांस खाणे पूर्णतः सुरक्षित आहे. चिकन-अंडी यांच्या विक्रीवर कोणत्याही प्रकारचे निर्बंध लावण्यात आले नाहीत, अशी माहिती राज्याचे पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी दिली. .राज्यात पक्षी मृत झाल्याचे आढळल्यास, व्यावसायिक पोल्ट्री फार्ममधील पक्ष्यांमध्ये नेहमीपेक्षा जास्त मृतक झाल्याचे निदर्शनास आल्यास तात्काळ नजिकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात माहिती द्यावी. मृत पक्षांना हात लावू नये किंवा शवविच्छेदन करु नये किंवा त्यांची परस्पर विल्हेवाट लावू नये.राज्यात #बर्डफ्ल्यू रोगाबाबत शास्त्रीय माहितीचा आधार नसलेले गैरसमज व अफवा पसरवू नका. काही समस्या असल्यास पशुसंवर्धन आयुक्तालयाच्या टोल फ्री क्रमांक १८००२३३०४१८ वर त्वरित संपर्क साधून माहिती देण्याचे आवाहन पशुसंवर्धन मंत्री केदार ‌यांनी केले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post